News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

बारामती लीनेस क्लब तर्फे एमआयडीसी अग्निशमन केंद्रात रक्षाबंधन संपन्न

बारामती लीनेस क्लब तर्फे एमआयडीसी अग्निशमन केंद्रात रक्षाबंधन संपन्न


बारामती:प्रतिनिधी
बारामती येथील लीनेस क्लबच्या वतीने एमआयडीसीतील अग्निशमन केंद्रामध्ये जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. 
याप्रसंगी बारामती लीनेस क्लबच्या अध्यक्षा उज्वला शिंदे, खजिनदार मनीषा खेडेकर, कॅबिनेट ऑफिसर सुवर्णा मोरे, विजया कदम व सुनिता तावरे आदींनी जवानांचे औक्षण करून राख्या बांधल्या.
बारामती एमआयडीसी अग्निशमन केंद्रप्रमुख सुनील इंगवले यांनी लीनेस क्लब च्या उपक्रमाचे स्वागत करून घरगुती सोसायटी, सार्वजनिक ठिकाणे, औद्योगिक कंपन्या आदी ठिकाणी आग लागल्यानंतर व अपघात प्रसंगी अग्निशमन दलाच्या कार्यपद्धती बाबत आणि आग लागू नये म्हणून दक्षता कशी घ्यावयाची या बाबत मार्गदर्शन केले.
लीनेस क्लबच्या अध्यक्षा उज्वला शिंदे यांनी अग्निशमन दलाचे जवान संकट काळी जीवित हानी व वित्त हानी थांबवण्यासाठी, प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून करत असलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
 बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी गृहिणी व विद्यार्थ्यांसाठी अग्निशमन उपकरणे वापरण्याचे प्रात्यक्षिकाचे कार्यक्रम आयोजित करावेत त्यासाठी बारामती एमआयडीसी अग्निशमन केंद्र व बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
या रक्षाबंधन कार्यक्रमादरम्यान उपस्थित लीनेस क्लबच्या सदस्यांना अग्निशमन केंद्रातील उपकरणे, फायर ब्रिगेड वाहन, आपत्कालीन परिस्थितीत वापरली जाणारी अत्याधुनिक यंत्रसामग्रीची माहिती केंद्रप्रमुख सुनील इंगवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.
लीनेस विजया कदम यांनी प्रास्ताविक केले. सुनिता तावरे यांनी मनोगत व्यक्त केले व मनीषा खेडेकर यांनी आभार मानले.

फोटो ओळ:
 बारामती एमआयडीसी अग्निशामक विभागात रक्षाबंधन साजरे करताना लीनेस क्लब च्या सदस्या

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment