सभासदाच्या हितासाठी कटिबद्ध:बाळासाहेब डेरे
सभासदांना १०% लाभांश जाहीर
बारामती:प्रतिनिधी
सभासद हा संस्थेचा प्रमुख घटक असून त्याच्या व कुटूंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे व आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी आणि सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन फेरेरो कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब डेरे यांनी केले.
बारामती एमआयडीसी येथील
फेरेरो कर्मचारी सहकारी पतसंस्था ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार २४ ऑगस्ट रोजी संपन्न झाली.या वेळी बाळासाहेब डेरे उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करत होते.
या प्रसंगी पतसंस्थेचे
चेअरमन विठ्ठल चव्हाण, व्हाईस चेअरमन बाळासाहेब माने मानद सचिव नितीन पवार, तज्ञ संचालक किरण तावरे, बाळासाहेब रायते ,श्रीकांत गायकवाड ,सचिन भगत, किशोर मंडलिक, राकेश साबळे, सचिन लंगोटे संचालिका वर्षा जाधव व सुवर्णा काळे उपस्थित होते.
संस्थेची उलाढाल २० कोटी वरून २५ कोटी उलाढाल झाली. असून संस्थेत ९ कोटी पर्यंत सभासदांनी ठेवी ठेवून विश्वास दाखवला आहे. सभासदांना १०% लाभांश प्रोरेट पद्धतीने जाहीर करण्यात आला तसेच तसेच संस्थेला ऑडिट अ वर्ग देण्यात आलेला आहे व औद्योगिक क्षेत्रात सर्वात जास्त प्रगती करणारी संस्था म्हणून नावलौकिक असल्याचे बाळासाहेब डेरे यांनी सांगितले.
सभेची प्रस्तावना सचिन भगत व श्रीकांत गायकवाड यांनी केली. मानद सचिव नितीन पवार यांनी सभेचे इतिवृत्त चे वाचन केले.
चेअरमन विठ्ठलराव चव्हाण व
बाळासाहेब रायते यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार प्रदर्शन किरण तावरे यांनी केले.
फोटो ओळ:
सभासदांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब डेरे व शेजारी उपस्थित संचालक
–-------------------
Post a Comment