News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कटफळ येथे नागपंचमी उत्साहात साजरी

कटफळ येथे नागपंचमी उत्साहात साजरी


बारामती: प्रतिनिधी
 अजितदादा इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कटफळ (दि.30. ) येथे नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम संस्थेच्या सचिव सौ संगीता मोकाशी व सर्व शिक्षिका यांनी नागाच्या वारुळाची पूजा केली.
      चल ग सये वारुळाला वारुळाला, नागोबाला पूजायाला पूजायाला
 असे म्हणत विद्यार्थिनींनी गोल रिंगण करून फेर धरला. विद्यार्थिनी झिम्मा - फुगडी मोठ्या उत्साहात खेळल्या. तसेच शाळेतील मुलांनी शाळेच्या प्रांगणामध्ये पतंग उडवल्या. 
यावेळी आयुष सागर खराडे आणि रेवा ओंकार शेंडे या इयत्ता दुसरीतील दोन विद्यार्थ्यांनी शंकर-पार्वतीची वेशभूषा साकारून शंकर-पार्वतीचे रुप सर्वासमोर सादर केले. शंकराची वेशभूषा केलेला विद्यार्थी आयुष खराडे या विद्यार्थ्याने शाळेच्या भव्य प्रांगणात तांडव नृत्य सादर केले. शाळेचे प्रांगण गर्दीने फुलले होते. मान ठेवूया नाग राजाचा,पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा,जतन करुया आपल्या निसर्गाचे.असे वेेगवेगळे संदेश विद्यार्थ्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत वणवे यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.

फोटो ओळ: 
नागपंचमी निमित्त आयोजित कार्यक्रमात शिव पार्वती वेशभूषा केलेली विद्यार्थी

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment