News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

ॲड. सुप्रिया बर्गे यांना बालगंधर्व ट्रस्ट चा मानाचा आदर्श वकील पुरस्कार प्रदान

ॲड. सुप्रिया बर्गे यांना बालगंधर्व ट्रस्ट चा मानाचा आदर्श वकील पुरस्कार प्रदान



बारामती:प्रतिनिधी
बालगंधर्व रंगमंदिर च्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवार ट्रस्ट व पुणे महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने मानाचा आदर्श वकील पुरस्कार बारामती च्या 
ॲड. सुप्रिया बर्गे यांना प्रदान करण्यात आला.
बुधवार २५ जून रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमात सहकार व नागरी विमान वाहतूक चे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व अभिनेत्री दीपाली सय्यद
अभिनेते प्रशांत दामले श्रीमती लीला गांधी व राष्ट्रवादी च्या रुपाली ठोंबरे आणि बालगंधर्व परिवार ट्रस्ट चे अध्यक्षा श्री मेघराज राजेभोसले यांचे हस्ते ॲड. सुप्रिया बर्गे यांना वकिली क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आदर्श वकील सन्मान प्रदान करण्यात आला.  

ॲड सुप्रिया बर्गे यांना वकिली व्यवसायातील १७ वर्षांचा अनुभव आहे. यशश्री फाउंडेशन च्या माध्यमातून हॅपी मॅरीड लाईफ हे समुपदेशन व मध्यस्थी केंद्र त्या चालवितात. यामध्ये विवाहपूर्व, विवाहानंतर समुपदेशन केले जाते. पतिपत्नी मधील वाद मिटविणे, कुटुंबातील सासू, सासरे, दिर जाऊ, नणंद, सुन, जावई, मुलगी, भाऊ, यांच्यातील वाद सामोपचाराने मिटविण्याचे कार्य त्या अनेक वर्ष करीत आहेत. भारतातील कुटुंबसंस्था टिकावी, न्यायालयावरील कौटुंबिक वादाचा अतिरिक्त भार कमी करण्यास मदत ह्यावी, आपल्या कायदेविषयक ज्ञानाचा समाज्याच्या प्रत्येक घटकास उपयोग व्हावा यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. कायदेविषयक जनजागृतीचे कार्य त्या सातत्याने करीत असतात. घटस्फोटाचे, कुटुंबीक हिंसाचाराचे, बाललैंगिक अत्याचाराचे प्रमाण कमीकरण्यासाठी त्या अनेक सामाजिक उपक्रम राबववून समाज प्रबोधनाचे कार्य करीत असतात.
त्यांना दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक कोर्ट केसेस शिताफीने हाताळण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. बारामती, पुणे, मुंबई हाय कोर्ट याठिकाणी त्या वकिली व्यवसाय करीत असून त्या पतिपत्नी चे ऑनलाईन कौन्सेलिंग देखील करतात, त्यांना त्यांच्या कार्यास पती ॲड.विशाल बर्गे, व सासरे ॲड.विजयकुमार बर्गे यांचे विशेष सहकार्य लाभते. बर्गे अँड बर्गे असोसिएट या लीगल फर्म च्या माध्यमातून बर्गे परिवाराने हजारो पीडितांना न्याय मिळवून देण्यास मदत केली आहे.
 वकिली व्यवसायातील उत्कृष्ट कार्यासाठी, विधी व न्याय क्षेत्रातील योगदानासाठी बालगंधर्व परिवार ट्रस्ट यांनी ॲड. सुप्रिया बर्गे व ॲड.विशाल बर्गे यांचा भव्य सन्मान मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या व हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे केला.
पीडित व गरजवंत यांच्या साठी मोफत वकिली क्षेत्रातील योगदान देत राहू सदर पुरस्काराने कार्य करण्याचे मनोबल वाढले असल्याचे ॲड. सुप्रिया बर्गे यांनी सांगितले.

फोटो ओळ: ॲड. सुप्रिया बर्गे यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment