राष्ट्रीय खेलो इंडिया पिंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या मुलींची गेल्डन कामगिरी
बारामती:
दि :-०१ ते ०४ मे रोजी क्राईस्ट अकॅडमी मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय पिंच्याक सिलाट खेलो इंडिया उमन्स लीग स्पर्धा पार पढली या स्पर्धेत भारतातील एकूण ३५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धा स्पोर्ट्स अथोरेटी ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने झाल्या या स्पर्धेसाठी इंडियन पिंच्याक सिलाट असोसिएशन चे अध्यक्ष श्री किशोर येवले, खासदार नरेश म्हस्के,साई चे ऑबजरवर प्रमोद सिंगडे, शीतल ताई कचरे शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष नवी मुंबई तारिख भाई व आदिल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत बारामतीच्या योद्धा स्पोर्ट्स क्लब च्या ४ मुलींची निवड राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेसाठी झाली होती. यामध्ये वैष्णवी गुळवे व यशश्री माने यांनी गंडा या प्रकारात गोल्ड मेडल मिळवून १०,०००rs रुपयाची खेलो इंडियची स्कॉलरशिप मिळवली तर श्रेया गरजे या खेळाडूने फाईट (टँडिंग) या प्रकरत हरियाणा व मध्यप्रदेश आणि दिल्ली च्या खेळाडूला हरवून रजत पदक मिळवून आपल्या नावे ६००० रुपयांची स्कॉलरशीप मिळवली, तर आर्य बोडरे या खेळाडूने अतिशय चांगली कामगिरी केली. या सर्व खेळाडूंनी साहेबराव ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीत योद्धा स्पोर्ट्स क्लब अकॅडमी या ठिकाणी गेली ४ वर्ष प्रॅक्टिस केली. या सर्व खेळाडूंना सूर्यनगरीतील सर्वच पालकांनी अतिशय मदत केलेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सूर्यनगरीतील अक्षय (काका)थोरात(योद्धा युवा प्रतिष्ठान अध्यक्ष), प्रवीण माने ( अंनत युवा प्रतिष्ठान अध्यक्ष), अक्षय जगताप, अनंत भोसले, किशोर गरजे, सुरेश बोडरे, चंद्रकांत माने, राहुल गुळवे इत्यादीनी कौतुक केले व योद्धा स्पोर्ट्स क्लब ला लागेल ती मदत करण्याचे आश्वसन दिले. योद्धा स्पोर्ट्स क्लब गेली १२ वर्ष बारामती वा सूर्यनगरी परिसरात मुलांना ट्रेनिंग देण्याचे काम करत आहे. आजपर्यत अनेक मुलं राष्ट्रीय व अंतराराष्ट्रीय स्पर्धेत चकमकली आहेत. आणि याच कारणामुळे बारामतीतील पालकांनाचा विश्वास योद्धा स्पोर्ट्स वर आहे आणि तो कायम राहील
या सर्व खेळाडूंना राज्यसभा खासदार सौ. सुनेत्राहिनी पवार यांनी शुभेच्छा दिल्या
Post a Comment