बौद्धिक क्षमता तपासूनच करिअरची निवड करावी- हेमचंद्र शिंदे
भारतीय जैन संघटना च्या वतीने 'करिअर कम्पास' फौंडेशन कार्यक्रम
बारामती: प्रतिनिधी
विद्यार्थी चे व आई वडिलांचे शैक्षणीक स्वप्ने साकार करताना व करिअर निवडण्या पूर्वी बौद्धिक क्षमता तपासणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करिअर मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे यांनी सांगितले.
भारतीय जैन संघटना (BJS), बारामतीच्या महिला व पुरुष विभागातर्फे आयोजित चौथा फौंडेशन कार्यक्रम "करिअर कम्पास" नुकताच अनेकांत इंग्लिश मिडियम स्कूल, बारामती येथे यशस्वीरीत्या पार पडला.
अभ्यासातील प्रभावी तंत्र, स्पर्धा परीक्षांची तयारी, अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करणे आणि योग्य करिअर निवड याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना करिअर मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे यांनी बारकावे सांगितले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रोजेक्ट हेड प्रा. राहुल शहा व प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर यश संघवी व सौ. बिजल दोशी व
शाखा अध्यक्ष सम्यक छाजेड, महिला अध्यक्षा गीतांजली शहा सचिव रमेश मुथ्था, उपाध्यक्ष विपुल शहा (वडुजकर), स्वप्नील पहाडे, अजित बेदमुथा, सचिव, नंदिता शहा, अर्चना सराफ, लता ओसवाल, संगीत मेहता, अर्पण दोशी, शीतल धोका, कोमल कोठारी आदी उपस्तीत होते.
मोठी स्वप्ने ही पाहिलीच पाहिजेत परंतु त्यासाठी बौद्धिक क्षमता तसेच जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे का हे प्रथम पाहिले पाहिजे.
करिअर कम्पास' ही भारतीय जैन संस्थेच्या तिथिग्राम उपक्रमाचा एक भाग आहे, ज्याद्वारे सामाजिक, शैक्षणिक, मार्गदर्शन व कौशल्य विकास यामार्फत भावी पिढी सक्षम व समर्थ बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे संयोजकांनी सांगितले.
फोटो ओळ: विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना करिअर मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे
Post a Comment