विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरीसाठी निवड
बारामती:प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बारामती येथील अंतिम वर्षातील विविध शाखांतील ५६ विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी या नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या तांत्रिक कौशल्य, संवाद कौशल्य, तसेच मुलाखत प्रक्रियेमधील उल्लेखनीय कामगिरी यावर भर देत हे यश संपादन केले आहे.
७.५ लाख रुपये वार्षिक पॅकेजसाठी निवड झालेले विद्यार्थी
फौजिया मजार शेख, प्रसाद रमेश साळुंके, जय बापूराव माने, अमित बंडू स्वामी, अंजली बाप्पासाहेब काळे, अभिषेक गणेश शिर्के, अभिजीत अनिल वाबळे, ऋषभ शर्मा, अनुजा संजय शिंदे, महीन अर्शद सय्यद
५.७५ लाख रुपये वार्षिक पॅकेजसाठी निवड झालेले विद्यार्थी
साक्षी अनिल उगळे, श्रेया जगदीश परकाळे, श्रुती नंदकुमार बनसोडे, सार्थक किरण गिरमे, करण पांडुरंग जाधव, सृष्टी सचिन पटवा, अंकिता सुहास गायकवाड, ऐश्वर्या धनंजय कोरे, वैष्णवी विकास सपाटे
४.२५ लाख रुपये वार्षिक पॅकेजसाठी निवड झालेले विद्यार्थी
रुचिता महादेव बागल, आदित्य प्रकाश कोंडेकर, प्रथमेश संजय शिंदे, अनिश अजित काकडे, प्राजक्ता सुरेश केळकर, धीरज दत्तात्रय जाधव, आरती युवराज कर्चे, प्रिया संभाजी घाडगे, श्रुती संजय जाधव, रोहित रामदास गाढवे, सिद्धांत अभिनंदन बुर्ले, प्रतिक नवनाथ पवार, अमृता प्रकाश देवकाते, मारिया बानो, उन्नती अविनाशराव फुलमंते, आदित्य उदय मोरे, सौरभ अजिनाथ काळेल, गायत्री संजयकुमार यादव, गणेश हनुमंत देशमुख, पूजा दत्तात्रय गायकवाड, आरती संतोष होळ, सोनू प्रसाद महतो, जशोदा प्रकाश चौधरी, स्मिता तुकाराम देशमाने, किरण बाळासो वाबळे, वेदिका संतोष जाधव, आदित्य भरतकुमार तावरे, आकांक्षा जालिंदर माने, श्रुती श्रीकांतराव महापूरकर, प्राची बालाजी उपरे, पूर्वा नीलेश रणवरे, सिद्धांत संदिप गोलांडे, ओम आनंदसागर खटावकर, तेजस गुणवंत वाघमोडे, शुभम अशोक पाचपुते, प्रीती सतीश इंगोले, वरद शंकर बोरावके
गेल्या काही वर्षांपासून आयटी क्षेत्र समाधानकारक कामगिरी करत नसतानाही, संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना सातत्याने चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत त्यामुळेच गेल्या ६ वर्षात २००० हुन अधिक अभियांत्रिकी आणि १००० हुन अधिक विविध शाखेच्या पदवीधारक विद्यार्थ्यांना जॉब मिळाले आहेत. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे जॉब साठी निवड होणे हि संस्थेसाठी गौरवाची बाब असल्याचे सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. विशाल एस. कोरे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सेक्रेटरी ॲड. नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची आणि मॅनेजमेंट कॉऊन्सिलचे सर्व सदस्य, रजिस्ट्रार श्रीश कंबोज, प्राचार्य, पालक, संस्थेतील सर्व कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.
कॅपजेमिनी कंपनीच्या कॅम्पस ड्राईव्ह यशस्वी होण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे टीपीओ सुरज कुंभार, संतोष करे, व्यंकटेश रामपूरकर, डॉ. रवींद्र पाटील, शिवाजी रासकर, प्रदीप घोरपडे, मयूर गावडे, चारुदत्त दाते आणि प्रवीण नगरे यांचे मोलाचे योगदान लाभले.
फोटो ओळ:
प्लेसमेंटद्वारे निवड झालेले विद्यार्थी व अधिकारी
Post a Comment