आत्याधुनिक युगात उदोजकाचे योगदान महत्वाचे : ललित गांधी
महाराष्ट्र चेंबर्स च्या वतीने महाराष्ट्र दिनी गुणवतांचा सन्मान
बारामती:प्रतिनिधी
उदोजक टिकला तर अनेकांना रोजगार प्राप्त होते, शहराचे वैभव वाढते,देशाचे नाव उज्वल होते म्हणून अत्याधुनिक भारत करण्यासाठी व अत्याधुनिक युगात उद्योजकांचे स्थान व योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन जैन अल्पसंख्यांक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे राज्य अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रतिपादन केले.
१ मे महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर बारामती विभागीय कार्यालय यांच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान आणि महाराष्ट्र गौरव गाथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ललित गांधी बोलत होते.
या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, प्रांताधिकारी वैभव नावडकर, क्रेडाई राज्य अध्यक्ष प्रफुल्ल तावरे, भारत फोर्ज चे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय अग्रवाल, बँक ऑफ महाराष्ट्र च्या मुख्य अधिकारी सुचिता जोशी,आर्यन बॉयलर चे राजेंद्र इंगवले आणि
महाराष्ट्र चेंबर्स चे विभागीय चेअरमन शरद सूर्यवंशी,व्हा.चेअरमन शिवाजीराव सूर्यवंशी, सुशीलकुमार सोमाणी व सदस्य जगदीश पंजाबी, मनोज तुपे, विकास आडके ,भारत जाधव, साईनाथ चौधर आदी मान्यवर उपस्तीत होते.
महाराष्ट्र चेंबरच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणे ही काळाची गरज असून ज्यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे त्यांच्या पाठीवर शाब्बासकी देणे ही आपली संस्कृती असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले.
उदोजक,व्यापारी,व शेती आदी क्षेत्रातील सर्वांना बरोबर घेऊन चेंबर कार्य करत असून गुणवंतांचा आदर्श घेऊन समाज्यातील नवीन गुणवंत तयार व्हावे या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे विभागीय चेअरमन शरद सूर्यवंशी यांनी सांगितले.
प्रास्ताविक शिवाजीराव निंबाळकर यांनी केले.
एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, युनियन बँक ऑफ इंडिया चे रिजनल हेड मयंक भरद्वाज, कार्यकारी अभियंता एमआयडीसी बारामतीचे विजय पेटकर यांना उद्योग मित्र पुरस्कार
तर कायनेटिक इलेव्हेटर्स पुणेचे शहाजी चांदगुडे दिनकर भिसे, सिद्धेश प्रोजेक्ट अँड सर्व्हिसेस कंट्रक्शन टेक्नॉलॉजी चे कुशल खैरनार, ओम साई इंटरप्राईजेस चे संदीप मोरे सोनाली मोरे यांना उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मधून आयपीएस पदी निवड झाल्याबद्दल अभिजीत रामदास चौधर यांचा सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले तर आभार ऍड पी टी गांधी यांनी मानले .
फोटो ओळ: महाराष्ट्र चेंबर्स च्या कार्यक्रमात ललित गांधी इतर मान्यवर
Post a Comment