News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

इस्कॉन बारामतीमध्ये नरसिंह चतुर्दशी उत्सव भव्य भक्तीभावात साजरा — जवानांसाठी विशेष प्रार्थना आणि आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल

इस्कॉन बारामतीमध्ये नरसिंह चतुर्दशी उत्सव भव्य भक्तीभावात साजरा — जवानांसाठी विशेष प्रार्थना आणि आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल



बारामती – इस्कॉन बारामती मंदिरात नरसिंह चतुर्दशीचा उत्सव अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात साजरा करण्यात आला. भक्तांच्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात आध्यात्मिकतेच्या उत्सवाबरोबरच देशसेवेचाही अनुपम संगम अनुभवायला मिळाला. पाकिस्तान विरोधी युद्धात केलेल्या कामगिरीसाठी भारतीय जवानांकरीता विशेष प्रार्थना अर्पण करण्यात आली.
या भक्तिमय कार्यक्रमाची सुरुवात मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉ. युवराज भोसले (श्रीमान युगावतार प्रभू), यांच्या भावपूर्ण अशा भागवत प्रवचनाने झाली. त्यांनी भक्ती, धैर्य आणि परमेश्वराच्या संरक्षणाच्या भावनेवर आधारित नरसिंह अवताराचे उद्दिष्ट भक्तांपुढे उलगडले.
यानंतर नरसिंह कवच पठण, अभिषेक, कथा, कीर्तन, नाटिका सादरीकरण, आणि नरसिंहआरती अशा विविध कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला. श्रीमान युवराज हरी प्रभूंनी कथेतून नरसिंह भगवंतांच्या लीलांचे प्रभावी आणि हृदयस्पर्शी विवेचन करत भक्तांना भगवंतांच्या अनंत सामर्थ्याची जाणीव करून दिली.
भगवान श्रीकृष्णांचा नरसिंह अवतार अधर्माचा नाश करण्यासाठी आणि भक्त प्रल्हादांचे रक्षण करण्यासाठी झाला. अहंकारी राक्षस हिरण्यकशिपूला मारण्यासाठी त्यांनी हे रूप धारण केले. या अवतारातून भक्तांच्या श्रद्धेचे रक्षण, अहंकाराचा नाश आणि धर्माची पुनर्स्थापना हे मुख्य उद्दिष्ट होते. नरसिंह अवतार आपल्याला शिकवतो की भगवंत हे भक्तांचे सदैव रक्षण करतात आणि सत्य व धर्माचा नेहमी विजय होतो, असे मौलिक विचार त्यांनी यावेळी उद्गारले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भक्तांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला. 
या संपूर्ण उत्सवाबाबत मंदिर व्यवस्थापन प्रमुख श्रीमान नंददुलाल प्रभू यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण होते. त्यांनी सांगितले की, "या उत्सवाचा उद्देश केवळ धार्मिकता जपणे नसून समाजात अध्यात्म आणि शांतीचा संदेश पोहोचवणे हाही आहे." या भक्तिपूर्ण दिवशी इस्कॉन बारामती मंदिर परिसरात एकतेचा, भक्तीचा आणि संस्कृतीचा सुंदर संगम पहावयास मिळाला.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment