महिला दिना निमित्त दंत तपासणी
बारामती:प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त एमआयडीसी येथील लक्ष्यशिला फाउंडेशन च्या अभ्यासिका कडून मोफत दंत तपासणी शिबिरात २०० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली
या प्रसंगी लक्ष्यशिला फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अजय ओमासे व कॉम्रेड अकॅडमीचे संचालक आनंद सावंत, डॉ विराज गोफणे, डॉ प्रीतम यादव, नागेश गावडे, डॉ कीर्ती इसावे उपस्तीत होते.
अभ्यासिका माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा व नीट, जेईई, सीईटी चा अभ्यास करताना त्यांच्या आरोग्याची सुद्धा दक्षता महत्वाची म्हणून सदर उपक्रम घेतला असल्याचे अजय ओमासे यांनी सांगितले.
फोटो ओळ: महिला दिन निमित्त दंत आरोग्य तपासणी प्रसंगी डॉक्टर व विद्यार्थी
Post a Comment