शिवजयंती निमित्त योगा प्रात्यक्षिक
बारामती:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त न्यु शिवक्रांती युवा प्रतिष्ठान च्या वतीने वक्तृत्व कला, पोवाडा सादरीकरण व योगा प्रात्यक्षिक चे आयोजन केले होते.
सोमवार दि.१७ मार्च रोजी शिवजयंती निमित्त आयोजित भव्य मिरवणूक प्रसंगी न्यु शिवक्रांती युवा प्रतिष्ठान च्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळाचा, गोंधळी वाघ्या मुरळी, पोतराज आदी कलाकारांचा व लाठीकाठी,तलवार बाजी, ढाल पट्टा फिरवणे आदी खेळाडू चा सन्मान करण्यात आला व द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकॅडमी जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथील बाल खेळाडूंनी विविध योगासने सादर केली
डीजे विरहित शिवजयंती साजरी करताना कलाकार, खेळाडू यांनी त्याची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण व्याहवे व यातून देश पातळीवरील खेळाडू,कलाकार निर्माण व्याहवेत म्हणून शिव व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचे न्यू शिवक्रांती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत नवसारे यांनी सांगितले
फोटो ओळ:
शिवजयंती निमित्त योगा प्रात्यक्षिक सादर करत असताना बाल खेळाडू
Post a Comment