News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

महिलांसाठी एक दिवस उपक्रम महत्वाचा: स्वाती ढवाण

महिलांसाठी एक दिवस उपक्रम महत्वाचा: स्वाती ढवाण


विविध उपक्रमातून महिलांचा सन्मान 

बारामती: प्रतिनिधी 
वर्षभर महिला गृहणी, नोकरी, व्यवसाय करत संसार उत्कृष्ट करत असतात त्यांना विरंगुळा मिळावा, त्यांच्या मधील विविध कौशल्य,कला यांना संधी मिळावी व त्यांचा आत्मविश्वास वाढावा या साठी सत्कार व विविध खेळ असे पूर्ण दिवसभर कार्यक्रम चे आयोजन केले म्हणून' एक दिवस महिलांचा उपक्रम' महत्वाचा असल्याचे प्रतिपादन पिंपळी लिमटेक च्या सरपंच स्वाती ढवाण यांनी सांगितले.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यश मिळणाऱ्या महिला, मुलींचा सन्मान आणि महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी माय मिनिस्टर कार्यक्रम चे आयोजन व बक्षिस वितरण प्रसंगी पिंपळी लिमटेक च्या सरपंच स्वाती ढवाण बोलत होत्या .
 या प्रसंगी बारामती नगरपरिषद च्या मा. नगरसेविका सुहासिनी सातव व शुभांगी सातव आणि ग्रामपंचायत पिंपळीच्या सदस्यां, मंगला केसकर, अश्विनी बनसोडे, मंगल खिलारे, निर्मला यादव, स्वाती पवार, वंदना पिसाळ व अंजना खोमणे, सुरेखा देवकाते, कल्पना बाबर, शारदा ढवाण, नीलिमा ढवाण, शोभा ढवाण, दिपाली ढवण, शुभांगी ढवाण, व सामाजिक कार्यकर्ते अशोकराव ढवाण अंबिका टेक्सटाईल पार्कच्या संचालिका रोहिणी आटोळे, गुळघर च्या संचालिका रोहिणी बोबडे 
आदी मान्यवर उपस्तीत होते .
 चांडाळ चौकडीच्या करामती फेम अभिनेते रामभाऊ जगताप यांचा ' माय मिनिस्टर' कार्यक्रमात प्रथम साक्षी खरात द्वितीय नलिनी सतीश गावडे, तृतीय अश्विनी निलेश बर्गे उत्तेजनार्थ रोहिणी अनंत काटे, पारुबाई खंडाळे यांनी बक्षिसे जिंकली.
आभार दीपाली ढवाण यांनी मानले.

फोटो ओळ: 
माय मिनिस्टर विजेत्यांचा सन्मान करताना स्वाती ढवाण व अशोकराव ढवाण आणि इतर मान्यवर महिला

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment