News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सोमेश्वर कारखाना आर्थिक गैरव्यवहार प्रकरण..| संबंधीत विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन | तात्काळ गुन्हा दाखल होणार

सोमेश्वर कारखाना आर्थिक गैरव्यवहार प्रकरण..| संबंधीत विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन | तात्काळ गुन्हा दाखल होणार


 बारामती 
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये रोजंदारी बेसिसवर काम करणाऱ्या कर्मचारी व कामगार यांचे हजेरी नोंदीमध्ये संगनमताने कारखाना प्रशासनाची फसवणूक करुन आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी कारखान्याचे लेबर व टाईम ऑफीस विभागातील लेबर ऑफीसर, हेड टाईम किपर, टाईम किपर, सर्व क्लार्क्स व कर्मचारी यांचे निलंबन करण्याचा निर्णय संचालक मंडळाने दि.२७/०२/२०२५ रोजी पार पडलेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेमध्ये घेतला असून सोबतच या सर्वांविरोधात व लेबर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदार यांचेवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.


 जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, आपला श्री सोमेश्वर कारखाना सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर असताना कारखान्याच्या कामकाजामध्ये चुकीचे काम करणाऱ्या कोणत्याच घटकाला पाठीशी घालू नये अशी कारखान्याचे मार्गदर्शक व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय  अजित पवार यांची संचालक मंडळास वेळोवेळी सुचना असते ब्रास लयाअनुसरुनच संचालक मंडळ काम करण्याचा प्रयत्न देखिल करत असते. असे असताना जाणीवपुर्वक कारखान्याच्या प्रगतीमध्ये अडसर ठरेल व कारखान्याचे नुकसान होईल असे काही अधिकारी कामगार यांनी कामकाज केल्याचे निदर्शनास आल्याने या अधिकारी व कर्मचारी यांचे विरोधात तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून नियमानुसार कायदेशीर मुद्दे विचारात घेवून याप्रकरणाची इंडस्ट्रीयल व लेबर न्यायालयामध्ये काम पाहणाऱ्या तज्ञ वकिलांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करुन नियमाप्रमाणे सखोल तपास करण्याचा निर्णय देखिल संचालक मंडळाने घेतलेला आहे.


याप्रकरणाची गंभीरता लक्षात घेता सन २०१५ पासून आजअखेरपर्यंत रोजंदारी कर्मचाऱ्यांची हजेरी नोंद व प्रत्यक्ष दिलेला पगार, झालेले कामकाज इत्यादीची मान्यताप्राप्त सनदी लेखापालामार्फत ऑडीट करुन चौकशी करणेचा निर्णय देखिल घेणेत आलेला आहे.  जगताप  म्हणाले की, या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कठोरपणे कारवाई करणेचा संचालक मंडळाने निर्णय घेतलेला असून यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे संचालक मंडळाच्या वतीने समस्त सभासद व शेतकरी यांना अश्वस्त करत आहोत.


Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment