News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

माजी विद्यार्थी भेटले ४० वर्षांनी

माजी विद्यार्थी भेटले ४० वर्षांनी

 

बारामती: प्रतिनिधी 
श्रीमंत शंभू सिंह महाराज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज माळेगाव बुद्रुक या विद्यालयातील सन 1983 84 या बॅचचा गेट-टुगेदर चा कार्यक्रम अतिशय उत्साह व आनंदाच्या वातावरणात साजरा झाला इयत्ता दहावीची ही बॅच ४० वर्षांनी एकत्र आल्यामुळे विद्यार्थ्यांचे मध्ये आनंदाचे वातावरण होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना निमंत्रित केले होते यामध्ये श्री खाडे सर तांबोळी सर नलवडे सर एजगर सर यांना शिकवणारे गुरुवर्य उपस्थित होते त्याचप्रमाणे संस्थेचे उपाध्यक्ष रमेश पाटील गोफणे उपाध्यक्ष डीएन पाटील तावरे संस्थेचे सचिव श्री रंजन कुमार तावरे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते स्कूल कमिटीचे अध्यक्ष मनोज सस्ते संस्थेचे सदस्य सुरेश राव निंबाळकर सतीश राव तावरे विलासराव तावरे जवाहर सस्ते आदी मान्यवर उपस्थित होते या बॅचमधील विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुवरांचा आदर सत्कार सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक माने सर व त्यांचा सर्व स्टाफ उपस्थित होता या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक माझी विद्यार्थी /विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री प्रकाश धुमाळ सर, राजेंद्रकुमार सस्ते, एडवोकेट नायकोडे सर, डॉक्टर सौ. सुरेखा आडके/पाटोळे, सौ. छाया सोनवणे, सौ. बुचके मॅडम सौ. तावरे मॅडम सौ. जाधवराव मॅडम , या माझीविद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून गुरुजींना बद्दल आदर व शाळेबद्दल भावना व्यक्त केल्या अनेक विद्यार्थी जुनी आठवणी मध्ये रमलेली होती या कार्यक्रमाच्या निमित्ताने या बॅचचे गुरुजन श्री खडे सर यांनी विद्यार्थ्यांना जुन्या आठवणी सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या संस्थेचे उपाध्यक्ष रमेश पाटील गोफणे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव रंजनकुमार तावरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार पांडुरंग भापकर यांनी केले सर्व विद्यार्थी आपल्या दहावीच्या वर्गामध्ये एकत्र बसून जुन्या आठवणी ना उजाळा दिला यावेळी इंग्रजी विषय शिक्षक एजगरसर यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व माझी विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ढोल व लेझीम याद्वारे केले व शालेय विद्यार्थ्यांनी दोस्ती या गीतावर सर्व माजी विद्यार्थी व मान्यवरांच्या समोर सादरीकरण केले याचे नियोजन सध्याचे विद्यालयाचे शिक्षक श्री शिंदे सर व माहुले सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक शिंदे एन एस यांनी केले

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment