News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

अबॅकस मध्ये विद्या प्रतिष्ठान ची राजनंदिनी शिंदे देशात दुसरी

अबॅकस मध्ये विद्या प्रतिष्ठान ची राजनंदिनी शिंदे देशात दुसरी


बारामती:प्रतिनिधी
१७ वी राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा ठाणे मुंबई या ठिकाणी संपन्न झाली.या मध्ये विद्या प्रतिष्ठान डॉ सायरस पुनावाला शाळेची इयत्ता ३ री मधील विद्यार्थिनी राजनंदिनी हर्षवर्धन शिंदे हिने देशात दुसरा क्रमांक मिळवून ग्रामीण भागातील व प्रतिस्पर्धका मधून सर्वात कमी वयात यश मिळवणारी विद्यार्थिनी म्हणून शाबासकी सुद्धा मिळवली आहे.
 तसेच २०२३ व २०२४ या वर्षी राजनंदिनी ने अशाच स्पर्धा मधून देशात तिसरा दुसरा क्रमांक पटकावला होता.
वर्ष २०२५ या राष्ट्रीय स्पर्धे मध्ये देशातील ४००० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. देशाच्या विविध भागात परीक्षेच्या फेऱ्या घेण्यात आल्या होत्या अंतिम फेरी ठाणे येथे घेण्यात आली. डॉ काशिनाथ घाणेकर नृत्यालय ठाणे येथे बक्षिस समारंभ संपन्न झाला.
गणित विषयात १०० समीकरणे विथ अबॅकस ५ मिनिटात आणि १०० समीकरणे बौद्धिक रीतीने विदाऊट अबॅकस तीन मिनिटात सोडवली ८ वर्षाच्या राजनंदिनी हिने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तिला अबॅकसच्या शिक्षिका भाग्यश्री जगताप व विद्या प्रतिष्ठान शाळेतील गणिताच्या शिक्षिका संगीता कौले यांनी मार्गदर्शन केले.

फोटो ओळ: 
२०२५ च्या परितोषक सह राजनादिनी शिंदे

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment