ज्ञानसागरच्या संस्कार दराडे यांची शासकीय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
बारामती
दि. 21 ऑगस्ट 2024 रोजी बारामती क्रीडा संकुल या ठिकाणी शासकीय शालेय तालुका स्तरावरील कुस्ती क्रीडा स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुल सावळमधील कुस्तीपटू संस्कार दराडे यांने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. बारामती तालुका क्रीडा अधिकारी श्री.आदेश चावले साहेब यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व क्रीडाशिक्षक ललित लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कुस्ती स्पर्धेत यश मिळवले.
ज्ञानसागर गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष डाॅ सागर आटोळे, सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, विश्वस्त पल्लवी सांगळे, दिपक सांगळे, दीपक बीबे, सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वनवे, मुख्याध्यापक सुधीर सोनवणे, दत्तात्रय शिंदे, नीलिमा देवकाते , सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.
Post a Comment