रुई मध्ये 'लाडकी बहीण' योजनेसाठी शिबीर
बारामती: प्रतिनिधी
बारामती शहरातील रुई येथे
पुणे जिल्हा राष्ट्रवादी चे सरचिटणीस प्रा. अजिनाथ चौधर यांच्या
जनसंपर्क कार्यालयात 'मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण' योजनेच्या लाभासाठी अर्ज नोंदणीचे शिबिर पार पाडले. त्याला रुई आणि पंचक्रोशीतील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला ६०० महिलांनी सदर शिबिरात सहभाग घेतला व त्याचे फार्म भरून घेण्यात आले.
रुई परिसरातील कुठलेही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहता कामा नये म्हणून फॉर्म कसा भरायचा व कागतपत्रे कोणती जोडायची किंवा ऑनलाइन अर्ज भरायचा असेल त्याची माहिती देण्यात आली व शंकाचे समाधान करण्यात आले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत प्रत्येक महिलांना रुपये १५०० मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून एकाच छताखाली सर्व माहिती मिळावी, महिलांचा वेळ वाचावा म्हणून सदर शिबिराचे आयोजन केल्याचे प्रा अजिनाथ चौधर यांनी सांगितले.
फोटो ओळ:
रुई येथे महिलांना मार्गदर्शन करताना प्रा. अजिनाथ चौधर
-----------------
Post a Comment