बारामती योद्धा स्पोर्ट्स क्लब च्या मुलांची 5 व्या वेस्ट झोन पिंच्याक सिलाट स्पर्धेत सोन्याची लूट
बारामती: प्रतिनिधी
1 ते 3 में दरम्यान पांचगणी येथे झालेल्या 5 व्या वेस्ट झोन स्पर्धेत भारतातील 7 राज्यांनी सहभाग नोंदवीला होता या स्पर्धेत महाराष्ट्र टीम मध्ये बारामतीच्या योद्धा स्पोर्ट्स क्लबच्या 21 मुलांनी सहभाग नोंदवीला होता. ही स्पर्धा ऐकून 5 पाच इव्हेन्ट मध्ये पार पढली. या स्पर्धेचे उदघाट्न इंडियन पिंच्याक सिलाट फेडरेशन चे अध्यक्ष श्री. किशोर येवले, अमीन हाजीफिल्म (अभिनेता निर्माता सिंचालक ) दिव आणि दमनचे फिलिया थॉमस, अलेक्साझाडर, उत्तर प्रदेश चे अभय श्रीवास्तव, गोवा राज्याचे पदाधिकारी व महाराष्ट्र पिंच्याक सिलाट चे पदाधिकारी साहेबराव ओहोळ, पौर्णिमा तेली, अरविंद शिर्के, सुरेखा येवले, संजीव वारे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पढला,
रेग्यु टीम :-वैष्णवी गुळवे, श्रेया गरजे, आर्य बोडरे, अमृत मलगुंडे, आदित्य आटोळे, दिनेश तावरे, तुंगल :-रुद्र नाले, अनुष्का गवळी, द्विज कांबळे, हर्षवर्धन भोसले, स्नेहल झिरपे, प्रीती केकाण, परिनिता रूपनवर, गंडा टीम :- यशश्री माने, फाईट :- ओमराजे चोपडे, केशव जाधव, ऋषिकेश जाधव, ऋतुराज घुले, वेदांत गोलांडे,वरद जगताप, उत्कर्ष जठार इत्यादी मुलांनी 9 गोल्ड, 10 सिल्वर, 12 ब्रॉन्झ असे एकूण 31 पदक पटकवून महाराष्ट्राच्या शिरपेच्यात मनाचा तुरा रोवाला, या सर्व मुलांना योद्धा स्पोर्ट्स क्लब अकॅडमीचे सर्वेसर्वा साहेबराव ओहोळ यांनी प्रशिक्षण योद्धा स्पोर्ट्स क्लब च्या माध्यमातून दिले आहे. योद्धा स्पोर्ट्स क्लब बारामती व परिसरता गेली 12 वर्ष गुणवंत खेळाडू घडविण्याचा प्रयत्न करत आहे. येणाऱ्या 38 व्या इंडियन ऑलम्पिक च्या राष्ट्रीय स्पर्धेत बारामतीचे खेळाडू सहभागी होतील असा विस्वास त्यांनी दिला.
हा खेळ एशियन गेम, एशियन बीच गेम, एशियन युथ गेम, भारतीय विश्विद्यालय संघ, भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड इत्यादी ऑफिशियल राष्ट्रीय व अंतराराष्ट्रीय स्पर्धेत खेळाला जातो. या खेळाला 5% केंद्रीय नोकरभर्ती मध्ये आरक्षण असल्यामुळे या खेळात मुलांना नोकरभर्ती मध्ये चांगली संधी उपलब्ध झाल्यामुळे युवकांचा खेळाकडे कल वाढत आहे अशी माहिती साहेबराव ओहोळ यांनी दिली.
या सर्व खेळाडूंना सौ. सुनेत्रावाहिनीसाहेब पवार (अध्यक्ष हाय टेकस्टाईल ) किशोर येवले अध्यक्ष इंडियन पिंच्याक सिलाट यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,
फोटो ओळ:
विजेते खेळाडू व प्रशिक्षक समवेत मान्यवर
Post a Comment