फ्रान्स शेती अभ्यासकांचा सावंतवाडी,गोजुबावी गावामध्ये अभ्यास दौरा
बारामती: प्रतिनिधी
शनिवार दि.09 मार्च रोजी सावंतवाडी गोजुबावी येथील शेतकरी
गोरख आनंदराव सावंत यांच्या शेतावर व मिलिंद वाल्मिक सावंत, यांच्या देशी / गावरानी बियांच्या बीज बँकेला फ्रान्सच्या शेतकरी गटांनी भेट देऊन माहिती घेतली.
फ्रान्स वरून शेतकरी आंतरराष्ट्रीय संवाद या जागतिक संस्थेचे ११ शेतकरी व एम.आर.ए
या संस्थेचे शेतकरी टीम शिवार फेरी केली व पद्मश्री डॉ सुभाष पाळेक कृषी (SPK) तंत्र व या नैसर्गीक शेती पद्धती मधे भारतीय देशी गाईचे महत्व या विषयी सखोल माहिती घेतली व पुढे फ्रान्स मध्ये जाऊन या SPK शेती पद्धतीचे प्रयोग करणार आहेत
व त्या नंतर समींद्राताई देशी गावरानी बीज बँकेची पाहणी करुन विविध प्रकारच्या भाजीपाला बियांची माहिती घेतली. त्यांना श्री प्रसाद घोंगडे यांनी शेती विषयी इंग्लीश मधून संवाद साधुन संपुर्ण माहिती दिली.
या शिवारफेरी साठी ज्येष्ठ नागरिक निवास चे विश्वस्वत अभय शहा यांनी सहकार्य केले.
फोटो ओळ: फ्रान्स चे शेतकरी माहिती घेताना
Post a Comment