News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे रविवारी इपिलेप्सी शिबीराचे आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे रविवारी इपिलेप्सी शिबीराचे आयोजन


बारामती, दि. ४- सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत इपिलेप्सी फाऊंडेशनच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे रविवार ७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता इपिलेप्सी (अपस्मार) शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

या शिबीरात न्युरोफिजिशियन डॉ. निर्मल सूर्या व त्यांचे सहकाऱ्याच्यावतीने इपिलेप्सी (आकडी अपस्मार, फेफरे, फीट येणे) अशा रुग्णांची मोफत ई.ई.जी. रक्ततपासणी करुन उपचार करण्यात येणार आहे. तसेच रुग्ण व नातेवाईकांचे समुपदेशनही करण्यात येणार आहे. भौतिकोपचार, व्यवसायोपचार, वाचा व भाषाविकार उपचारही करण्यात येणार आहेत. रुग्णाला तीन महिन्यांची औषधेही विनामूल्य दिली जाणार आहेत. 

या शिबीराचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची पूर्वनोंदणी आवश्यक असून आशा स्वयंसेविका, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाशी किंवा ८६२६०६३८५८, ७०८३९५४४५७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या शिबाराचा अधिकाधिक गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment