शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बारामतीच्या कु.सिध्दी बोराला कांस्यपदक
बारामती: प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पिंपळी येथील विद्या प्रतिष्ठान न्यू बालविकास मंदिर,पिंपळी शाळेतील कु.सिद्धी बोरा विद्यार्थिनीने दिल्ली येथील एस जी एफ आय ( SGFI) च्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी सी.बी.एस.सी वेल्फेअरकडून राष्ट्रीय स्तरावरील निवड झाली आहे.
सिद्धी बोरा हिने दिल्ली येथे चालू असलेल्या देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी सी.बी.एस.सी वेल्फेअर कडून निवड झाल्याने तालुक्यातून राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करण्यात आले.
दि.16 डिसेंबर 19 डिसेंबर या कालावधीमध्ये छत्रसाल स्टेडियम मॉडेल टाउन दिल्ली येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण भारत देशातून विविध राज्याच्या टीम सहभागी झालेल्या होत्या. या स्पर्धेत बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या सिद्धी बोरा हीने सतरा वर्ष आतील वयोगटांमध्ये 56 ते 60 वजन गटातून भारतामध्ये तृतीय क्रमांक पटकावून ब्राँझ मेडल मिळवून दिले. या स्पर्धेकरता तिला क्रीडा शिक्षक प्रसाद रणवरे,साधना खोमणे, मंदार कळसकर तसेच बारामती कराटे असोसिएशनचे प्रमुख रवींद्र कराळे यांचे मार्गदर्शन करण्यात आले. तिच्या निवडीबद्दल विद्या प्रतिष्ठान चे विषवस्त व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तनुश्री गोरे व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे
फोटो खाली:
विद्या प्रतिष्ठान विद्यार्थिनी सिध्दी बोरा राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये कांस्यपदक देऊन सन्मान करताना
Post a Comment