भट्टी या लघुपटाची जगविख्यात JIO MAMI film फेस्टिवल मध्ये मराठी टॉकीज या section मध्ये झाली निवड
भट्टी या लघुपटाने या अगोदर जगभरातील नामांकित फेस्टिवल मध्ये आपली छाप उमटवली आहे
जगातील असंख्य कामगारांच्या अस्तित्वावर बोट ठेवणारा उपेक्षित कामगारांच्या प्रश्नाचं वास्तव दाखवणारा 'भट्टी' हा लघुपट शिवाजी करडे दिग्दर्शित आणि निलेश धुमाळ निर्मित, हा लघुपट सध्या वेगवेगळी मानांकन घेत यशाची घोडदौड करत आहे.
Jio MAMI मुंबई चित्रपट महोत्सवाच्या 2023 च्या लाइनअपमध्ये 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या 10 दिवसांत 250 हून अधिक चित्रपट आहेत. क्युरेशनमध्ये 40 हून अधिक वर्ल्ड प्रीमियर्स, 45 आशिया प्रीमियर्स आणि 70+ दक्षिण आशिया प्रीमियर्स सादर केले जातात, ज्यांची रेकॉर्डब्रेक संख्या आहे. दक्षिण आशिया कार्यक्रमासाठी 1000+ सबमिशन झाले आहेत.
'भट्टी' ही केवळ कामगारांची व्यथा मांडनारी कथा नाहीतर ही कथा आहे जगभरातील असंख्य उपेक्षित कामगारांच्या प्रश्नांची. बेकारी, कर्ज, भूक यासगळ्याचा समतोल साधण्यासाठी पाहीलेल्या स्वप्नांचा भुसा मिसळून ते ह्या लाल मातीत कालवताना दिसतात. कामगारांची आर्थिक पिळवणूक, शारिरीक छळ या असंख्य भांडवलशाही संकटांना सामोरं जाऊन आपलं जीवन जगतात( गेली कित्येक वर्ष उलटून गेली तरी कामगार वर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही . आज विज्ञान युगात आपण म्हणतो की समाज वैचारिक रित्या सुधारलाय, पण तस काही झालेलं दिसत नाही, कारण आजही त्याच पद्धतीने कामगार वर्गाला टॉर्चर केल जात, शारीरिक रित्या, मानसिक रित्या, आर्थिक रित्या किंवा लैंगिक रित्या त्यांची फसवणूक केली जाते. पाहिजे तसं याना राबवल जात.
मला असं वाटत कामगार वर्गानेही त्यांना त्यांच्या अन्यायाला बळी न पडता त्यांच्या विरोधात उभा राहील पाहिजे नाहीतर हा अन्याय जसा पिढ्यान पिढया होत आलेला आहे तसा होतच राहील.- लेखक दिग्दर्शक- शिवाजी करडे.)
या लघुपटाचे चित्रीकरण बार्शी येथे झालेले असून, वर्षा मालवणकर, शरद जाधव, राम गोविंदवाड, मलशीद्ध देशमुख यांनी प्रमुख भूमिका साकारल्या असून मंगेश आरोटे, अपूर्वा कदम, किशोर गायकवाड,काकासाहेब शिंदे यांनी सहाय्यक भूमिकेचे काम पार पाडले.
आनंद मनसुक यांनी छायाचित्रन केले असून संकलन प्रतीक पाटील यांनी केले आहे, तसेच वेशभूषा- आकाश बनसोडे, कला दिग्दर्शन- अतुल लोखंडे , रंगभूषा - विठ्ठल सोनवणे , संगीत - अमित पाटील, ध्वनी मुद्रण - आकाश छाया लक्ष्मण, ध्वनी संकलन - अमित पाटील,
कलर - प्रतीक सारजोशी,
कला सहाय्यक - शाम सर्वगोड,
निर्मिती व्यवस्थापन - महेश क्षीरसागर , परमेश्वर भोंडवे.
तर गणेश डुकरे, विक्रम बोळेगावे, किशोर गायकवाड,लखन चौधरी,सुधाकर शिंदे यांनी सहाय्यक दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे.
Post a Comment