News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मानवसेवा हीच ईश्वर सेवा: सत्यव्रत काळे

मानवसेवा हीच ईश्वर सेवा: सत्यव्रत काळे


आई प्रतिष्ठान च्या वतीने विविध सामाजिक  उपक्रम 

बारामती: पुढारी वृत्तसेवा 
सामाजिक काम केल्याने आत्मिक समाधान मिळते व मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे बारामती नगरपरिषद चे मा बांधकाम सभापती सत्यव्रत काळे यांनी प्रतिपादन केले.

शरयु फौंडेशन च्या अध्यक्षा सौ शर्मिला  पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आई प्रतिष्ठान व सत्यव्रत अर्जुनराव काळे मित्र परिवार यांच्या वतीने  1 ऑक्टोबर 2023 रोजी बारामती मध्ये फूटपाथ वरील भिक्षुक यांना ब्लॅंकेट वाटप व महिलांना गिफ्ट व साहित्य वाटप आणि  मिशन बोर्डिंग येथील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन व केक कापण्याच्या कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्यवत काळे बोलत होते याप्रसंगी
 जिल्हास्तरीय जुदो कुस्ती स्पर्धेमध्ये बारामती शहरातील युवा पैलवान वंश गायकवाड व विनोद गायकवाड या दोन बंधूंनी द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला  
या  कार्यक्रमासाठी  मा. उपनगराध्यक्ष  नवनाथ बल्लाळ, अल्ताफ सय्यद,संचालक.मुस्लिम बँक, चर्चेस ऑफ खराईस्ट चे  चेअरमन बाळासाहेब जाधव, सचिव रॉबर्ट गायकवाड व  सुभाष जांभुळकर,  सिद्धनाथ भोकरे, निलेश इंगुले, इम्रान पठाण, तानाजी पाथरकर, अनिल कदम,  निलेश पलंगे, साधू बल्लाळ, सुधाकर काटे, भाऊसाहेब पडळकर, सुधाकर माने, राजेंद्र सोनवणे,  विजय शितोळे, भालचंद्र ढमे, शेखर बनकर,  सुरज देवकाते ,रमेश देशपांडे धर्माधिकारी साहेब ..... यांच्यासह युवक कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.... यावेळी नवनाथ बल्लाळ, अल्ताफ सय्यद,इम्रान पठाण,साधू बल्लाळ,तानाजी पाथरकर, बाळासाहेब जाधव,सुभाष जांभुळकर,गायकवाड सर, या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या..
 सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक  अनिल सावळेपाटील यांनी केले .आभार 
सत्यव्रत  काळे यांनी मानले

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment