News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

महिलांचे रक्तदान मध्ये योगदान म्हतपूर्ण: सुनेत्रा पवार

महिलांचे रक्तदान मध्ये योगदान म्हतपूर्ण: सुनेत्रा पवार


बिरजू मांढरे मित्र परिवाराच्या रक्तदान शिबिरास महिलांचा सुद्धा प्रतिसाद 

बारामती: 
महिलांसाठी आता पर्यंत केलेल्या कार्याची पावती मिळाली ,रक्तदान शिबिरात महिलांनी पुढे होऊन केलेले रक्तदान प्रत्येक घटकासाठी म्हतपूर्ण,आदर्श व प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन बारामती हाय टेक्सटाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले.
सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मा. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवार दि १६ ऑक्टोम्बर रोजी करण्यात आले होते. या वेळी सुनेत्रा पवार मार्गदर्शन करत होत्या या प्रसंगी बारामती नगरपरिषद चे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर,
राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, शहर अध्यक्ष जय पाटील,बारामती बँक चेअरमन सचिन सातव, राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीस प्रा अजिनाथ चौधर,
मा. नगरध्यक्षा भारती मुथा, मा.उपनगराध्यक्ष  राजेंद्र बनकर, अभिजित जाधव ,मा. नगरसेवक  सुधीर पानसरे, अभिजित चव्हाण  व , किशोर मासाळ,भाग्यश्री धायगुडे, सीमा चव्हाण, अंजली संगई,शुभम ठोंबरे,ऋषी देवकाते, गणेश शिंदे, तुषार लोखंडे, डॉ सौरभ मुथा,ऍड अमर महाडिक, नितीन लोखंडे आणि जांब ग्रामपंचायत चे सरपंच समाधान गायकवाड, सपकळ वाडी चे सरपंच तानाजी सोनवणे, मातंग एकता आंदोलन चे विनोद लोखंडे,,आर पी आय चे सुनील शिंदे 
आदी मान्यवर, पत्रकार,रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
"बारामती मध्ये रक्तदान ही चळवळ होत असताना ,माझ्या वाढदिवस निमित्त शिबीर आहे म्हणून  अनेक महिला पुरुषाच्या बरोबरीने  पुढे घेऊन  आवर्जून रक्तदान करतात ही सामाजिक बदल दर्शवणारी गोष्ट असल्याचे"  सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
अपघात,ऑपरेशन व इतर वेळी तातडीची रक्त ही गरज असल्याने व सामाजिक भान जपत रक्तदान शिबिराचे आयोजन  केले असून ७२७ बाटल्यांचे  रक्तदान केल्याचे बिरजू मांढरे यांनी सांगितले 
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले.वासुदेव, ढोलकी वादक, पोतराज आदी कलाकार मंडळी नी सुद्धा आवर्जून रक्तदान केले.


Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment