News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

स्वछता महत्वाची त्यासाठी प्रत्येकाचे योगदान गरजेचे : अजित पवार

स्वछता महत्वाची त्यासाठी प्रत्येकाचे योगदान गरजेचे : अजित पवार


अजित पवार यांनी शहरात स्वतः केली स्वछता 


बारामती:प्रतिनिधी
स्वछता ही प्रत्येक नागरिका साठी म्हतपूर्ण बाब आहे नगरपरिषद च्या मार्फत परिसरातील स्वछता होईल याची वाट न पाहता स्वछता आपल्या घरापासून ,गल्ली पासून करावी तरच स्वछता अभियानाचा उपयोग होईल या मध्ये प्रत्येकाने योगदान देण्याचे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले 
रविवार ०१ ऑक्टोबर रोजी 
बारामती नगर परिषद यांच्या वतीने स्वच्छता पंधरवड्या निमित्त 02 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती चे औचित्य साधून 'एक तारीख एक तास ' या स्वछता मोहीम चे बारामती शहरात आयोजन करण्यात आले होते त्याचा शुभारंभ महात्मा गांधी हौसिंग सोसायटी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी हाय टेक्स्टाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, मा.नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,बारामती बँक चेअरमन सचिन सातव, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष जय पाटील,मा नगरसेवक बाळासाहेब जाधव, अतुल बालगुडे, नवनाथ बल्लाळ, बिरजू मांढरे, राजेंद्र बनकर, अभिजित चव्हाण व मुख्यधिकारी महेश रोकडे, व विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी ,स्थानिक नागरिक इतर मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशांमध्ये स्वच्छता अभियान राबवत असताना सुंदर, हरीत बारामती स्वच्छ करताना प्रत्येकाने योगदान देताना नागरिक म्हणून मी स्वतः कचरा साफ करून सुरुवात केली त्याच प्रमाणे वर्षभर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जवाबदारी केवळ लोक प्रतिनिधी ची नाही तर प्रत्येक नागरिकांची असल्याचे अजित पवार यांनी सांगितले 
उपस्तीत प्रत्येकास स्वच्छतेची शपथ अजित पवार यांनी दिली.
या प्रसंगी टेक्निकल हायस्कुल व पोलीस अकॅडमी मधील विद्यार्थी सहभागी झाले होते 
उपस्तितांचे स्वागत मुख्यधिकारी महेश रोकडे यांनी केले तर 
सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले 

 *जेव्हा अजित पवार कचरा वेचक होतात* 
 स्वतः अजित पवार यांनी डोक्यावर टोपी घालून हातात ग्लोज घालून कवी मोरोपंत शाळा येथील रस्त्यावरील कचरा उचलला त्यानंतर रिकाम्या प्लॉट मधील कचरा उचलून कचरा गाडी मध्ये टाकण्यास सांगितले व मोकळे रिकामे प्लॉट ठेवू नका त्या ठिकाणी कचरा टाकतात एकतर संरक्षक भिंत घाला किंवा बांधकाम करा अन्यथा नगरपरिषद ने दंड करावा असा सल्ला दिला 
कचरा उचलत असताना घामाने भिजलेले अजित पवार व दुर्गंधी असलेल्या रस्त्यावर व परिसरात सुद्धा कचरा वेचत असताना स्वछता बदल जागरूक असलेला लोक प्रतिनिधी च्या रुपात पहावयास मिळाले.


Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment