News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाला बस सेवा सुरू ; विद्यार्थ्याच्या मागणीला यश

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाला बस सेवा सुरू ; विद्यार्थ्याच्या मागणीला यश


 बारामती:प्रतिनिधी
 तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथील विद्यार्थ्यांची  स्थलांतरित बस स्थानक ते महाविद्यालयाच्या प्रवासा दरम्यान गैरसोय होत होती. हे  टाळण्यासाठी बस सेवा सुरू करण्याची मागणी गेली दोन वर्षापासून सुरू होती. आत्ता त्या मागणीला यश आले असून  
स्थलांतरित बस स्थानक ते टि सी कॉलेज अशी बस सेवा महामंडळाने चालू केली आहे.
बस स्थानक ते महाविद्यालयाचे अंतर चार ते पाच किलोमीटर असून पायी ये-जाणारे विद्यार्थ्यांना खुप कसरत करावी लागत होती.  हे अंतर लांब असल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होत होता. त्यामुळे लवकरच बस सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती.

 प्रितम गुळूमकर आणि शुभम सावंत यांनी सातत्याने पाठपुरवठा करून उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  बस सेवा सुरू करण्यात आली.  गुरुवारी बसचे पूजा करण्यात आली यावेळी बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि गटनेते सचिन शेठ सातव, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा ताई तावरे,.API भांगे साहेब, सहाय्यक वाहतूक अधीक्षक कानडे साहेब, शेतकरी योद्धाचे संपादक योगेश नालंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, उपप्राचार्य डॉ.सचिन गाडेकर,डॉ.अशोक काळंगे,  डॉ.सीमा नाईक, डॉ. सीमा नाईक गोसावी,डॉ. रामचंद्र सपकाळ,रजिस्टर अभिनंदन शहा रसायनशास्त्र विभाग प्रमुख  डॉ.संजय काळे, युवा उद्योजक शुभम सावंत यांच्या उपस्थितीत बसचे पूजन झाले. 

बस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.  उपस्थित मान्यवरांनी देखील बसच्या प्रवासाचा आनंद घेतला . बस सेवा सुरू करण्यासाठी अजित दादा पवार यांचे स्वीप- सहाय्यक हनुमंतराव पाटील, तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर तसेच पुणे जिल्हा  उपाध्यक्ष प्रताप आबा पागळे  यांचे ही सहकार्य लाभले. यामध्ये महाविद्यालचा  विद्यार्थी प्रितम गुळूमकर  यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडत हे कार्य पूर्णत्वास नेले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment