News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

चिंचवड देवस्थानची वेबसाईट आता नवीन स्वरूपात

चिंचवड देवस्थानची वेबसाईट आता नवीन स्वरूपात





मोरगाव  - तब्बल ५२५ वर्षांची परंपरा लाभलेली, चिंचवड येथील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तींची भाद्रपद पालखी मोरगाव येथे असताना, भाद्रपद शुद्ध पंचमीच्या मंगल दिनाचे औचित्य साधून चिंचवड देवस्थानच्या नवीन वेबसाईटचे अनावरण करण्यात आले.  देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव व विश्वस्त विनोद पवार, आनंद  तांबे यांच्या हस्ते  हा कार्यक्रम संपन्न झाला.

चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधीपत्याखाली  मोरगाव, थेऊर सिध्दटेक ही  अष्टविनायक तीर्थक्षेत्रे आहेत . देवस्थानच्या वेब साईटचे अनावरण भाद्रपद यात्रेच्या निमित्ताने काल दि  २० रोजी करण्यात आले. यावेळी  देवस्थानचे कारभारी  किशोर जोशी, वेबसाईट डेव्हलप केलेले पिक्सेल पेपरचे श्रेयस पाटील व सायली खेडकर, तसेच  स्वप्नील देव, वरद देव व हर्षद जोशी व अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी  पंचक्रोशीतील अनेक मोरया भक्त देखील हा सोहळा पाहण्यासाठी  उपस्थित होते. 

चिंचवड देवस्थानच्या अधिपत्याखाली अष्टविनायकातील श्री क्षेत्र मोरगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिर, श्री क्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिर, श्री क्षेत्र सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक मंदिर तसेच श्री क्षेत्र चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर व श्री मंगलमूर्ती वाडा, नारंगी येथील श्री मोरया गोसावी महाराज मंदिर ही मंदिरे आहेत. 

चिंचवड, मोरगाव, थेऊर, सिद्ध्टेक व नारंगी या सर्व स्थानांचे वैशिष्ट्य दर्शवणारी तसेच या क्षेत्रांची महती  सर्वांपर्यंत पोहोचवणारी वेबसाईट   तयार करण्याची अनेक वर्षांपासूनची एक इच्छा आज श्री मयुरेश्वराच्या सानिध्यात पूर्ण होताना देवस्थानच्या सर्व विश्वस्तांना अत्यंत आनंद होत आहे. अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त श्री मंदार महाराज देव यांनी दिली.

सर्वाद्य क्षेत्र मोरगाव, श्री क्षेत्र थेऊर, श्री क्षेत्र सिद्धटेक व चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणारी ही वेबसाईट डेव्हलप करण्याची संधी आम्हाला मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो, व हे कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे आभार मानतो. अशी माहिती पिक्सेल न पेपर चे श्री श्रेयस पाटील व सायली खेडकर यांनी दिली .सर्व अनेक भाविकांनी https://chinchwaddeosthan.org/ या  वेबसाईटच्या माध्यमातून देवस्थानचे विविध उपक्रम तसेच या सर्व स्थानांची माहितीचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त  विनोद पवार  केले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment