News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

कमलनयन बजाज मध्ये इन्स्टिट्यूट विद्युत सुरक्षा प्रशिक्षण शिबीर संपन्न

कमलनयन बजाज मध्ये इन्स्टिट्यूट विद्युत सुरक्षा प्रशिक्षण शिबीर संपन्न


बारामती:
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे महाविद्यालयाची विद्युत अभियांत्रिकी शाखा व महाराष्ट्र शासन विद्युत निरीक्षक पुणे उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जून २०२३ रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये  विद्युत सुरक्षा प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मार्गदर्शन  करण्यासाठी रविराज कुंभार, योगेश सातपुते,तुषार शेलार, फकीर, महेश गावडे  उपकार्यकारी अभियंता बारामती ग्रामीण हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार डॉ.  निर्मल साहूजी, डॉ. अनिल हिवरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.  
         'विद्युत सुरक्षितता सर्वोच्च प्राथमिकता' हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागामार्फत  राज्यभर विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आपण आपल्या घरी, कार्यालयात, शेतात हमखासपणे वीज वापरतो. तसेच विद्युत उपकरणे आणि बिघाड झाली असेल तर वेळोवेळी वायरींगही बदलून घेतो. अशा वेळी काही महत्वाच्या बाबी आणि सूचनांचे पालन केले पाहिजे. तर निश्चितच सुरक्षिततेचा उपाय होऊ शकतो. कटु प्रसंग झाल्यास प्राण हानी टळू शकते. विद्युत सुरक्षा सप्ताहात मुख्यत्वे विद्युत संचमांडणी सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे, काय करू नये, विद्युत उपकरणे कशी हाताळावीत, उद्वाहनांचा सुरक्षित वापर करण्याबद्दलचे निकष, सुरक्षेच्या बाबी लक्षात घेऊन बनवले गेलेले नियम, गुणवत्ता, प्रशिक्षण, नियम न पाळल्यास होऊ शकणारी कारवाई अशा अनेक मुद्यांवर प्रकाशझोत टाकण्याचे महत्त्वाचे काम केले. सुरक्षित उपाय योजना म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात इ. एल. सी. बी. / एम. सी. बी. चा वापर करावा. तसेच प्रत्येकाने घरातील विद्युत पुरवठ्याचे काम हे कुशल कर्मचाऱ्यांमार्फत करून घ्यावे. तसेच आयएसओ मानांकित उपकरणे व विद्युत साहित्याचा वापर करण्याचा आग्रह धरावा असा मोलाचा सल्ला देऊन मार्गदर्शन केले. तसेच श्री. गावडे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू मानवी प्राणांतिक अपघात टाळले जावेत व समाजामध्ये विजेचा वापरा विषयी जागृतता निर्माण व्हावी हा होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख प्रा. रोहित तरडे, प्रा. श्रीमंती रोकडे तसेच विभागातील सर्व शिक्षक व शिकेतर कर्मचारी यांनी विशेष कष्ट घेतले. या कार्यक्रमासाठी प्रा. दीपक सोनवणे, प्रा. दीपक येवले, प्रा. अजिंक्य गोलांडे, प्रा. शिवाजी रासकर हे उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. निर्मल साहूजी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment