News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

बारामती जळोची येथील प्रांजल चोपडे आयएफओएस परीक्षेत देशात तेरावे

बारामती जळोची येथील प्रांजल चोपडे आयएफओएस परीक्षेत देशात तेरावे


बारामती:
जळोची येथील  प्रांजल प्रमोद चोपडे यांनी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या राष्ट्रीय पातळीवरील ऑल इंडिया सर्व्हिसेस च्या परीक्षेमध्ये देशात 13 वा क्रमांक प्राप्त केला आहे.

बारामतीतून इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये देशात तेराव्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारे प्रांजल प्रमोद चोपडे हे पहिलेच बारामतीकर ठरले आहेत. या निमित्ताने बारामतीच्या युवकांकडून राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळवण्याची एक उज्वल परंपरा सुरू झाली आहे.
मूळचे बारामतीकर असलेले प्रांजल प्रमोद चोपडे यांचे शालेय शिक्षण विद्या प्रतिष्ठान सीबीएससी शाळेमध्ये झाले. त्यानंतर अकरावी बारावी त्यांनी बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये केली. त्यानंतर पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये त्यांचे उच्च शिक्षण झाले.
गेल्या पाच वर्षांपासून ते या परीक्षेचा सातत्याने अभ्यास करीत होते. तीन प्रयत्नात अपयश आल्यानंतर देखील त्यांनी जिद्द व चिकाटी न सोडता अधिक खडतर परिश्रम करून चौथ्या प्रयत्नात यश संपादन केले. देशात तेराव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शनिवार १ जुलै रोजी  त्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर बारामती शहरात व जळोची मध्ये  आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यांच्या घरी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आज मित्रपरिवाराची मोठी गर्दी झाली होती.
आपले शिक्षक कुटुंबीय व मित्रमंडळी यांच्या सहकार्यामुळे या परीक्षेत आपण हे उत्तुंग यश मिळवू शकलो, अशी प्रतिक्रिया प्रांजल चोपडे यांनी दिली आहे. भारतीय प्रशासन सेवेत आयएएस व आयपीएस या दर्जाची आयएफओ एस सेवा समजली जाते. जळोची गावातून प्रथमच मोठ्या शासकीय पदावर जाण्याचा मान मिळाल्याने आनंद व्यक्त करताना ग्रामस्थ भारावून केले.
तर मुलांनी आई वडिलांच्या कष्टाचे जीच केल्याने अभिमान वाटत असल्याचे आई वडिलांनी सांगितले 

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment