ध्रुव प्रतिष्ठानकडून एक हात मदतीचा, ८६७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप
भोर प्रतिनिधी - कुंदन झांजले
ध्रुवचे प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य अलौकिक.
भोर तालुक्यातील ध्रुव प्रतिष्ठान सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहे .सामाजिक बांधिलकी जपत ध्रुव प्रतिष्ठाने समाजासाठी एक हात मदतीचा पुढे करत अनाथ ,गरीब , आदिवासी,गरजू विद्यार्थी शैक्षणिक व शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम टिटेघर येथे शनिवार( दि.२४ ) पार पडला. यावेळी हिर्डोस मावळ तसेच आंबवडे खोऱ्यातील ८६७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दप्तर, फुलस्केपवही, पेन, कंपास लागणारे सर्व दर्जेदार साहित्य कीटचे वाटप व उच्चशिक्षण घेणान्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वाटप केले गेले. या उपक्रमासाठी टेक्नोफोर इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, कमिन्स इंडिया फाउंडेशन आरती आणावकर यांनी मदत केली असल्याची माहिती ध्रुव प्रतिष्ठान अध्यक्ष राजीव केळकर यांनी दिली.
भोर तालुका हा दुर्गम डोंगरी भागात विखुरलेला आहे. अनेक कुटुंबे गोरगरीब असल्याने आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य मिळणे कठीण होत असते.मात्र आजच्या विज्ञान युगात शिक्षणाला खूप महत्त्व असल्याने, शिक्षणापासून कोणीही वंचित राहु नये म्हणून भोर तालुक्यातील टिटेघर येथील ध्रुव प्रतिष्ठान राजीव केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक बांधिलकी जपत वर्षानुवर्ष विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच शिष्यवृत्ती वाटपाचे कार्य करीत आहे असे मान्यवरांनी सांगितले. यावेळी प्रमुख मान्यवर डॉ.सुरेश गोरेगावकर, भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.विजय जाधव, प्रा.डॉ.रोहिदास जाधव, केंद्र प्रमुख आंजना वाडकर, प्रा. सुदाम ओंबळे, प्रा.पंडित गोळे, मुख्याध्यापिका स्नेहल देशमाने, उपसरपंच माणिक नवघणे, तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव नवघणे, माजी सरपंच सोनबा दळवी, राहुल नवघणे, विजय वाडकर, राहुल खोपडे, योगीराज केळकर, शेखर भडाळे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते.
Post a Comment