करळे भावंडांची सुवर्ण कामगिरी; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत भाऊ-बहिणीने जिंकली दोन सुवर्णपदके!
बारामती: प्रतिनिधी
बारामतीच्या करळे भावंडांनी राष्ट्रीय कराटे स्पर्धेत दमदार कामगिरी करत दुहेरी सुवर्णपदकांची कमाई केली आहे. दिनांक ९ व १० मे २०२६ रोजी नाशिक येथे झालेल्या कॅम राज्यस्तरीय अजिंक्यपद कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून आयुष शंकर करळे (१३ वर्षांखालील मुले -५० किलो) आणि श्रुती शंकर करळे (१६ वर्षांखालील मुली -६१ किलो) यांची महाराष्ट्र संघात निवड झाली होती.
सदर कॅम राज्यस्तरीय अजिंक्यपद कराटे स्पर्धेचे आयोजन शिहान सल्लाउद्दीन अन्सारी व शिहान संदीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या.
उत्तराखंड राज्यातील देहरादून येथे दिनांक ३ ते ८ जून २०२६ दरम्यान आयोजित किओ सब-ज्युनिअर, कॅडेट व ज्युनिअर राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आयुष शंकर करळे याने १३ वर्षांखालील -५० किलो वजनगटात मणिपूर, बिहार, राजस्थान व ओडिशा राज्यांतील प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदक पटकावले.
तर श्रुती शंकर करळे हिने १६ वर्षांखालील -६१ किलो वजनगटात बिहार, दिल्ली, मध्यप्रदेश, आसाम व तामिळनाडू राज्यांतील खेळाडूंना पराभूत करत सुवर्णपदक जिंकले
एकाच कुटुंबातील सख्ख्या भाऊ-बहिणीने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदके जिंकण्याची ही अभिमानास्पद कामगिरी असून, करळे भावंडांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार व युवा नेते युगेंद्र पवार व
पुणे विभागाचे उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, संतोष लवटे तसेच विविध क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले
फोटो ओळ:
मान्यवरांच्या हस्ते पदक स्वीकारताना करळे भाऊ बहीण
Post a Comment