News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

जिजाऊ सेवा संघाच्या वतीने विविध स्पर्धा संपन्न

जिजाऊ सेवा संघाच्या वतीने विविध स्पर्धा संपन्न



बारामती: प्रतिनिधी
बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघ च्या वतीने नाग पंचमी निमित्त महिलां साठी पारंपरिक वेशभूषा व मेहंदी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी बारामती नगर परिषदेच्या मा. नगराध्यक्षा जयश्री सातव, व शुभांगी जामदार, छायाताई कदम, कल्पना शिंदे, विजया कदम व जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण व कार्यकारणी पदाधिकारी व सदस्या उपस्तीत होत्या.
पारंपरिक वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम दिशा सावंत, द्वितीय अश्विनी भोसले, तृतीय प्रज्ञा काटे व मेहंदी स्पर्धेमध्ये प्रथम जिया आत्तार,द्वितीय नाजनीन पठाण व तृतीय सुचित्रा शिंदे यांनी क्रमांक पटकाविला.
परीक्षक म्हणून मंगला बोरावके, शुभांगी महाडिक ,सुमय्या महंत यांनी काम पाहिले.
महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा भारतीय संस्कृतीमधील सण उत्सव साजरे करण्याचा आनंद व समाधान मिळावे म्हणून सदर कार्यक्रम चे आयोजन केल्याचे अध्यक्ष स्वाती ढवाण यांनी सांगितले .
या प्रसंगी महिलांनी मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, पर्यावरण व पाणी वाचवा आदी सामाजिक विषयावर प्रबोधन पर उखाणे सादर केले.
सूत्रसंचालन अर्चना शेंडगे यांनी केले आभार मनीषा शिंदे यांनी मानले.


Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment